गणपती बाप्पांचं पुन्हा एकदा आगमन झालंय आणि पुणं पुन्हा एकदा गजबजून गेलंय.
परत तीच मंडळं....चौका-चौकात गणपतीच्या मोठाल्या मूर्ती....परत तेच देखावे....परत तीच सगळी गाणी.... ’प्रथम तुला वंदितो, कृपाळा’... ’गणराज रंगी नाचतो’.... ’सा रे ग म प - म प ध नी सां’..’ॐ कार स्वरूपा’.... ’अशी चिक मोत्याची माळ’....
’या सगळ्याची खरंच गरज आहे का?’..... असे उगीच फालतू प्रश्न न विचारता मजा अनुभवायची ठरवली तर या दिवसांत मजा असते खरी. सगळं city scape च बदलून जातं...
कुठे शिवाजी महाराजांच्या विजयाचं गुणगान चालू असतं.... कुठे विष्णू नागावर विराजमान असतात.... कुठे एखादा शेष नाग गणपतीवर फण्याचं छत्र धरून असतो.... आणि बर्याच ठिकाणी of course chain of item-songs... I mean how can you miss it.... काही ठिकाणी त्यांच्या ठेक्यावर फेर धरणारे दिवे तर काही ठिकाणी त्यांच्या ठेक्यावर नाचणारी कारंजी...... आणि त्यासमोर नाचणारे अनेक पोट्टे.... ते देखावे आपल्या मुलांना दाखवायला आलेले अनेक आई-बाबा....असं सगळंच....
सगळीकडेआवाजच आवाज....
बिचारा गणपती.... येतानाचा उत्साह २ दिवसात ओसरून जात असेल त्याचा.... आणि मग फक्तच डोकेदुखी...
लोकांनी ना आरती झाल्यावर मोदकांबरोबर disprin-aspirin पण offer करायला पाहिजे गणपतीला.... सगळ्या २१ च्या २१ गोळ्या खातील गणपती बाप्पा....
या दिवसांमधली मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ढोल पथकांच्या मिरवणुका. गणेश चतूर्थीपूर्वी साधारण महिना- दीड महिना आधीपासून ढोल पथकांच्या तालमी सुरू होतात. कुठे शाळेच्या प्रांगणात तर कुठे नदीच्या काठी. आणि पहिल्या दिवशी गणपती बसताना आणी शेवटच्या दिवशी विसर्जन होताना या पथकांचे performances होतात. खरोखर देखणा सोहळा असतो.तरूण मुला-मुलींमधली energy channelise करायचा हा खूप सुंदर मार्ग आहे.
याच energy dissipation ची एक दुसरी बाजू आहे. पुण्यात झोपडपट्ट्यांमधे राहणारी ४०% लोकसंख्या आहे. या १० दिवसात हे सगळे लोक उत्साहानी सहभागी होतात. मला त्यांचा उत्साह बघून वाटतं की इतर वेळी somehow त्यांना ignored वाटत असेल का?.... म्हणजे इतर मध्यम वर्गीय लोकांसारखे ते राजरोसपणे चकचकीत रस्त्यावरून जात असतील का? कदाचित नसतील. बुजत असतील. आणि मग या १० दिवसात त्यांना गर्दीत त्यांच्या identity ची चिंता न करता मनमुरादपणे मजा करता येत असेल. वर्षातले ३५५ दिवस एखाद्या १० x १० च्या जागेत दाटीवाटीनी राहत असतील. toilet ला कुठे public toilet मधे नाहीतर उघड्यावर जात असतील....झोपडपटीतल्या अरुंद, अस्वच्छ गल्ल्यांमधे वावरत असतील.... मग त्यांना या १० दिवसात त्यांची रग जिरवावीशी वाटत असेल का?मिरवणुकीत मनसोक्त नाचत असतील....असं आपलं मला वाटतं.