बहावा किती वेडं झाड आहे!
फुलतं तेव्हा म्हणजे आतून बाहेरून नुसतं उसळून येतं...
स्वतःचं सौंदर्य, रंग सगळं बघणा-यावर लुटून टाकतं नुसतं....
मला त्याला नेहमी म्हणावसं वाटतं.... अरे वेड्या असं सगळं बघणा-यावरंच उधळून लावलंस तर तुला रे काय उरणार गड्या?
पण त्याला त्याची फिकीरच नाही....
ते स्वतःतच मग्न... स्वतःच्या बहराच्या उत्सवात बेहोष...
जाऊन काळा तीट लावावासा वाटतो...
तसेच रातराणी आणि निशिगंध...
आहे नाही तो सगळा सुवास आपला लावला उधळून
निदान स्वतःचा जीव केवढा ते तरी बघावं!
