कमळ-द-पारसनीस
म्हणजे...माझी आज्जी...
वय वर्ष 83. उंची साधारण साडेचार फूट
कानाला यंत्र लावावं लागतं आणि दाताला कवळी.
तर या आज्जी बरोबरचे काही संवाद
-------------------------------------------------------------------------
मी आज्जीचं नाक ओढते
आज्जी- 80 व्या वर्षी काही मोठं होणार नाहीये. नकटं ते नकटंच राहणार आहे नाक.
मी- अगं पण मग मला मुलांनी नापसंत केलं तर? म्हटले ही मुलगी नको, हिची आज्जी नकटी आहे तर?
आज्जी- मग मी येतच नाही ना समोर. म्हणजे प्रश्नच मिटला

आज्जी माझ्या खोलीत येते. माझ्या खोलीत एका कोपर्यात बर्याच प्लास्टिकच्या पिशव्या पडल्या आहेत. कशात जुने गिफ्ट रॅपिंग पेपर्स, कशात अजून प्लास्टिकच्या पिशव्या, कशात पेपर बॅग्स इ.इ.
आज्जी चिंतेनी त्याकडे बघते.
आज्जी- अमृता...आपण असं करूयात...एक मोठं पोतं घेऊ. आणि मग हे सगळं त्यात कोंबून ते वर ठेवून देऊ. कशी वाटते आयडिया?
मी- चालेल आणि तुला पण त्या पोत्यात बसवून वर ठेवून देऊ.
आज्जी- चालेल. मी आपली बघत बसीन वरून इकडे तिकडे

भारत मॅट्रिमोनी वर रिक्वेस्ट आलेल्या एखाद्या मुलाचा फोटो मी आज्जीला दाखवते
आज्जी- मला पसंत आहे मुलगा.
मी- मग तू करतेस का त्याच्याशी लग्न?
आज्जी- चालेल सांग त्याला. आज्जीला पसंत आहेस तू. (आणि मग मला पाठीवर एक धपाटा घालत) आजकाल फार फाजिल होत चालली आहेस बरं का तू...
---------------------------------------------------------------------------
अनघा अमेरिकेहून व्हिडिओ चॅट करतेय
आज्जी येते.
अनघा- whats up aajji??
आज्जी- (माझ्याकडे बघून) काय म्हणतिये ग ती?
मी- Whats up??
आज्जी- आपल्याला नाही बुवा कळत
मी- अगं तुला शिकवलंय की काय म्हणायचं ते. Nothing much
आज्जी- (अनघाकडे बघून) nothing much
(अनघा आणि मी खो खो हसत स्क्रीन वर टाळी देतो)
--------------------------------------------------------------------
मी चहा ओततेय. 2 पैकी एका कपाला थोडा तडा गेलाय.
आज्जी- तो फुटका कप आईला नाहीतर मला दे बरं का. बाबांना देऊ नकोस.
मी- !!!!!!!!!!!!का????????
आज्जी- पुरुषांना फुटके कप देत नाहीत.
मी- !!!!!!!!!!!!!!!का??????
आज्जी- तुला सासरी गेल्यावर कळेल.
(माझा <give up> होतो)
----------------------------------------------------------------------------------

Sahi amru.. Mazya samor tumchya gharcha chitra samor ala.. Ata aajila bhetayla lawkarach yete..
ReplyDeleteधन्यवाद! वाट बघते. लवकर ये :)
ReplyDeleteThank your gran for cheering me up :)
ReplyDeletesure :)
ReplyDeletetuzya aajicha e-galguchha ghyavasa wattoy... :D
ReplyDelete:D
ReplyDelete