Saturday, 10 March 2012

Oyster and Pearl

Oyster and Pearl ही पुण्यातली hospitals ची chain आहे.
त्यातलं ONP Tulip हे Speciality Hospital for Women and Children.


त्या hospital चा हा logo.
Logo design करतानाची सर्वसाधारण principles म्हणजे तो कमीत कमी आकारात अर्थ दर्शवणारा असावा. तो पटकन नजरेत भरणारा असावा. तो सोपा असावा म्हणजे अगदी छोटी प्रिंट असली तरी नीट दिसेल इ.इ.
ही सगळी principles तर हा logo follow करतोच. याशिवाय या hospital च्या concept विषयी अतिशय बोलकेपणानी बरंच काही सांगून जातो.
नावात येणारा शिंपला आणि मोती तर चित्रात दिसतातच.
याशिवाय दिसते ती बाहू पसरलेली आई आणि छोटं मूल.
एकमेकां‍शी रिंगणात फेर धरून खेळतायत जणू काही.
नुसतेच खेळत नाहीत तर एकमेकांना पूर्ण करतात. एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.
असाही भास होतो की आई जणू मुलाला अलगद वर उचलून घेतीये.
जरा रंग नीट बघितले तर दिसतं की आईचा रंग प्रौढ तरी गार हिरवा आहे. आणि मुलाचा रंग कोवळ्या पालवीचा हिरवा आहे. जणू पूर्ण वाढलेल्या झाडाच्या छायेत आता हा नवा वृक्ष बहरणार आहे.
याशिवाय आईचं सुरक्षित गर्भाषय आणि त्यात विश्वासानी वाढणारा गर्भ असाही या चित्राचा अर्थ होऊ शकतो.
दोन वक्राकार रेषा आणी दोन छोटी वर्तूळं. पण किती काय काय सांगून जातात.
एखादं graphic किती विलक्षण बोलकं असू शकतं त्याचं हा logo म्हाणजे उत्तम उदाहरण आहे.
एखादा उत्कृष्ट कलेचा छोटासा पण तुकडा असं wow!! feeling देतो.
अगदी असं वाटलं होतं जेव्हा पहिल्यांदा व्हॅन गॉ चं Starry night painting बघितलं. तेव्हा कोण व्हॅन गॉ काळा की गोरा ते पण माहित नव्हतं. पण त्या चित्राची मोहिनी इतकी जबरदस्त होती. Absolutely magical. अगदी अशीच चित्र M C Escher ची पण . आणि हेच feeling पहिल्यांदा कुमारांचं ’शून्य गढ शहर’ हे निर्गुणी भजन ऐकताना पण आलं होतं. नंदाकाकांकडे राहायला गेले असताना कुमारांवरची एक documentary बघायला मिळाली. कोई सुनता है. आणि तेव्हाच त्यांनी M C Escher चं पुस्तक पण वाचायला दिलं होतं. एक स्वरांची दुनिया तर एक रेषांची. पण दोघांमुळे मिळणा-या अनुभवात विलक्षण साम्य. तो अनुभव कला कुठलीही असो, त्या कलेच्या form च्या खूप कुठेतरी पार... वर असा असतो.

No comments:

Post a Comment