Tuesday, 16 July 2013

सावळी


New York च्या Museum of Modern Arts मधे एका painting नी मनाची विलक्षण पकड घेतली. इतकी की ते डोळ्यासमोरून हालेच ना. 

Henri Rousseau चं The Sleeping Gypsy. त्याच्या स्वतःच्याच शब्दात या चित्राबद्दल सांगायचं तर “A wandering Negress, a mandolin player, lies with her jar beside her (a vase with drinking water), overcome by fatigue in a deep sleep. A lion chances to pass by, picks up her scent yet does not devour her. There is a moonlight effect, very poetic.”

ते चित्र बघून आल्यावर मनात शब्दांची गर्दी झाली. ती कागदावर उतरवण्याचा हा प्रयत्न. 

सावळी

वर आभाळ सावळे, चंद्र फाकतसे प्रभा

डोळे मिटले सांगती, गुज अंतरीचे नभा

नार सावळी देखणी, धरेवरची चांदणी

पेंगुळल्या सुरांसंगे, घेई थकून विसावा

सावळा तो देह तिचा, निरागस अशी काया

भय नसे जिवाचेही, मन आनंदाची छाया

कोण कुठली ही नार, पहुडली भुईवर 

वनराज अचंबित, जणू निरखिसी तया