Friday, 23 August 2013

So…. What do you do?



तू काय करतेस?? किंवा what do you do? हा प्रश्न म्हणजे माझी एक अत्यंत दुखरी नस आहे.
हा प्रश्न ऐकला की मला धडकी भरते. कारण त्याच्यापुढे जे काही conversation होतं त्या दिव्यातून जाण्यापेक्षा मला धरणीमातेनी पोटात घेतलेलं बरं असं मला वाटतं. 

माझं शिक्षण B. Arch. M. Tech. (Environmental Planning)

आता B. Arch. याचा अर्थ Bachlor of Architecture असा जरी असला तरी B. Arch. असलेला माणूस म्हणजे Architect असतो असा त्याचा अर्थ मुळीच नाही. याला कारण आहे. B. Arch. हा ५ वर्षांचा course आहे. आणि यात architecture च्या विविध अंगांची केवळ तोंडओळख होते.

Architecture ला असताना आमचे एक सर नेहमी म्हणायचे 10% of architecture education is given in college. Rest 90% starts on site after you get into profession. त्यामुळे ज्याच्याकडे architecture ची degree आहे असं कोणीही कदाचित कागदावर उत्तम built scapes design करत असतील पण म्हणून ते architects मुळीच होत नाहीत. नुसत्या designing शिवाय architect ला site वर कामं करून घेणं हे ही जमायला हवं, शिवाय इतर building services बद्दल knowledge हवं, civil engineers बरोबर coordinate करता यायला हवं अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे B. Arch ची degree म्हणजे माणूस architect हे हास्यास्पद आहे. शिवाय उत्तम built scape design करायसाठी खरोखर फार वरच्या दर्जाची creativity लागते. जी खूप थोड्या लोकांमधे असते. आणि असली तरी या profession मधे इतर इतके constraints असतात उदा. Land availability, budget, building services (fire safety, plumbing, air conditioning etc.) , FSI की built scape मधे artistic expression ला hardly काही वाव राहतो. . 

Besides architecture चा course इतका flexible आहे की त्यानंतर अनेक प्रकारच्या post graduation ला shift होणं सहज शक्य असतं. उदा. Product design, furniture design, construction management, videology, photography, visual media, graphic design, urban planning, urban design, landscape design, environmental architecture आणि of course मी जे केलं ते म्हणजे policy planning & analysis. इतरही अनेक branches असतील ज्या मला माहीत नाहीत. (आमच्या college मधे तर ‘digital architecture’ असाही course सुरू झालाय. Now I fail to understand how architecture can be digital!!! असो. ) त्यामुळे बरेचसे architecture students B. Arch. नंतर field change करतात. 

तर मुद्दा असा आहे, की मी architect नाही कारण मी practicing architect नाही. म्हणून मी सांगायचं टाळते की मी B. Arch. आहे. 

उरता उरलं M. Tech. आता आम्हा planning वाल्या लोकांना ही ‘technology’ ची degree का द्यावी हा एक मोठा प्रश्न आहे. आम्ही जे करतो (मुळात आम्ही काय करतो हाही एक प्रश्नच आहे) त्याचा आणि ’technology’ चा सुतराम संबंध नाही. 

M. Tech. ऐकलं की लोकांना वाटतं की आम्ही sewage treatment plants design करतो, कोणाला वाटतं आम्ही solar power plants design करतो. मुळात planning म्हणजे एखादं project करण्यासाठी त्या आधी जो काही अभ्यास लागतो किंवा त्या project चा परिणाम काय झालाय हे तपासायला जो अभ्यास लागतो जो की काही crucial निर्णय (मुख्यतः policies संदर्भात) घेण्यासाठी महत्वाचा असतो तो अभ्यास. यात मुख्यतः social आणि financial feasibility studies हा भाग येतो. आता MBAs finance आणि planners मधे नक्की काय फरक आहे हे मला माहित नाही पण माझा असा समज आहे की MBA हे खूप profit oriented तर planning शक्यतो society च्या हिताच्या दृष्टीनी काय optimum आहे असा focus मधे जरा फरक असावा. पण I am not sure. मग यात अनेक streams आहेत उदा. Urban planning, regional planning, rural planning, infrastructure planning, transport planning, housing planning इ. इ. आणि अर्थातच मी जे केलं ते म्हणजे environmental planning. Environmental planning म्हणजे एखाद्या project चे पर्यावरणार वर काय परिणाम होतील आणि ते कमी कसे करायचे याचा अभ्यास. यात मुख्यतः वेगवेगळ्या experts ना एकत्र coordinate करून परिणामांचं एकसंध चित्र तयार करणं आणि त्यानुसार project मधे बदल किंवा उपाय सुचवणं हे EP वाल्यांचं काम. कारण पर्यावरणाच्या एखाद्या aspect वर जरी काम करायचं असेल तरी त्यात अनेक पातळ्यांवर काम करायला लागतं. त्यात लोकसहभाग लागतो. उदा. एखाद्या project मुळे समजा flora fauna वर परिणाम होणार असेल तर तो कमी करण्यासाठी काय करता येईल, त्यात गावपातळीवर काय प्रयत्न करायला लागतील, लोकांचा काय role असेल, एखादी वेगळी authority project structure मधे propose करायला लागेल का अशा बारा भानगडी. आणि शिवाय project प्रमाणे approach बदलणार. थोडक्यात ‘planners’ म्हणजे हे हे काम करतात असा एक ठराविक साचा नाही. प्रत्येक कामासाठी नवीन काही शिकावं लागतं.

आता आपण या blog post च्या मुख्य मुद्द्या कडे वळूयात. 
 
So….. what do you do??

नवीन भेटलेले लोक हमखास हा प्रश्न विचारतात.
याचं उत्तर मलाच धड माहित नसताना मी समोरच्याला काय कपाळ उत्तर देणार?
मग मी सांगते की मी environmental planning च्या field मधे आहे. आता इतकं ऐकून समोरच्यानी गप्प बसावं ना? पण नाही! “नाही पण म्हणजे तुमची background काय?”. मी मनातल्या मनात म्हणत असते “अहो मी सांगूनही तुम्हाला फारसं कळणार नाहीये….” पण समोरचा माणूस उत्तराच्या प्रतिक्षेत असतो. आपल्या चेहे-याकडेच बघत असतो मग उत्तर देणं भागच असतं. मग मी सांगते मी architecture केलं आणि मग environmental planning मधे M Tech केलं. 

आणि…… हाच असा तो एक अत्यंत धोकादायक क्षण असतो. कारण पुढचं संभाषण हे समोरच्यानी यातलं काय काय ऐकलंय आणि त्याला नक्की काय काय समजलंय यावर असतं.

काही जण फक्त मी architecture केलंय इतकंच ऐकतात आणि समज करून घेतात की मी buildings बांधते. आणि मग त्यांच्या प्रश्नांची किंवा सल्ल्यांची सरबत्ती सुरू होते. उदाहरणादाखल काही नमूने…
“आम्ही आत्ताच flat book केलाय. कोणत्या tiles वापराव्यात?”
“सध्या कडाप्प्याचा भाव काय आहे गं बाजारात? आमचा ओटा दुरुस्त करून घ्यायचा आहे”
“आम्हाला एक farm house बांधायचं आहे गावाकडे. तु बांधशील का?”
“आमची बाग जरा छान design करून दे ना”
“ते सध्या green buildings चं जोरात आहे बरं का. तुला माहिती आहे का त्यातली काही?”
“gulf countries मधे जा तू. तिथे सध्या architecture ला खूप scope आहे”
“आमच्या घराचं interior करून देशील का?”
“अरे वा म्हणजे आम्ही आता घर बांधायला तुलाच बोलावणार…. घरचा architect असला म्हणजे कसं बरं असतं ना” (का!!!)

काही जण environment आणि architecture ऐकतात. आणि मग विचारतात…
“म्हणजे तू बांबूची घरं बांधतेस का?”
“अगं अमक्या अमक्यांना एक घर बांधायचं आहे त्यांना जरा eco friendly सल्ला दे ना” (सल्ला eco friendly कसा असू शकतो?)”
“आमच्या घराचं rain water harvesting करून दे ना”
कोणी कुठून दहा हजार किलोमीटरवरून फोन करून विचारतात “अगं आम्ही घर बांधतोय, किंवा अमुक अमुक काहीतरी  बांधतोय तर ते eco friendly कसं करू?”
Eco friendly architecture ची जुजबी माहिती असणं वेगळं आणि त्याची practice करणं वेगळं. मुळात एखाद्दी building eco friendly करणं is a very specialized field. त्यात water management, energy management असे अनेक specialized मुद्दे असतात. आणि त्यासाठी दहा हजार किमी हे अंतर अंमळ जास्त आहे.

काही जण नुसतंच environment ऐकतात. आता environment हा शब्दच असा काही आहे… it’s all encompassing… आम्हाला environmental economics शिकवणा-या एका prof नी environment ची व्याख्या समजावताना फळ्यावर एक गोल काढला. म्हणे ही पृथ्वी आहे. मग त्यांनी त्याभोवती वातावरणाचा थर काढला. आणि म्हणाले या २ गोलांमधे मिळून ज्या काही गोष्टी बसतात त्या आणि त्यांचा परस्पर संबंध म्हणजे environment!!

असो. तर environment ऐकलेल्या काही लोकांना वाटतं की मी झाडे लावा झाडे जगवा करणारी आहे.
काहींना वाटतं मी industrial plants मधे pollution control करायची consultancy देते
काहींना वाटतं मी solar power plants design करते
काहींना वाटतं मी eco friendly sewage treatment चं काम करते
काहींना वाटतं मी green buildings certification चं काम करते
पुष्कळ लोकांना environmental planning हे ऐकूनच इतकं भारी वाटतं की ते एकदम खूषच होतात आणि मग मी नक्की काय करते ते विचारावसं वाटत नाही. असे लोक परवडले.

लोकांनी ही अशी मुक्ताफळं उधळली की अक्षरशः depression येतं. की आपल्याला लोक विचारतात ते काहीही कसं येत नाही??  I must be so dumb!!

आणि मुळात ह्या प्रश्नाला एकदा उत्तर देऊन सुटका नसते. मी free lance काम करते. आणि मला जे आवडेल ते काम करते. एका कामाचा दुसर्या कामाशी सुतराम संबंध नसतो. त्यामुळे सध्या मी हे हे काम करतेय असं सांगणंच सोयीस्कर असतं. पण तेच लोक परत काही महिन्यांनी भेटल्यावर मग सध्या काय चाललंय असं विचारतात. आणि उत्तर भलतंच निघालं की विचारतात पण तू तर ते वेगळंच काहीतरी करत होतीस ना??

गेल्या वर्षी माझ्याकडे निदान एक सोपं उत्तर होतं द्यायला, मी एका प्रयास नावाच्या NGO मधे policy analysis चं काम करते. आणि म्हणजे काय करते ते पण मी २ वाक्यात सांगू शकत होते. आणि लोकांना ते कळत होतं. पण आता ते काम पण संपलंय. आणि परत जुनाच पेच उभा राहीलाय. आता काय सांगायचं??

So… what do you do??
Umn…. Well….

No comments:

Post a Comment