Tuesday, 11 February 2014

आजकाल पुण्यात पेपरमधे एका नाटकाची जाहिरात येते "चला कामजीवन जगूया". आणि त्याची tagline अशी आहे- "बायकोने आकर्षक दिसण्याचा प्रयत्न केला तर काय बिशाद नव-याची नजर दुस-या बायकांकडे जाईल!".
या वाक्यात किती बेसिक लेव्हलचा प्रॉब्लेम आहे हे किती लोकांना कळतं माहित नाही. नाटक काढणा-यांना नक्की कळलेलं नाहीये.
म्हणजे आपल्या नव-याला आपल्याशी बांधून ठेवायला बायकोनी जिवाचा आटापिटा करायचा, सुंदर दिसायचं. शाश्वताचा शोध न घेता जे शरीर नश्वर आहे  त्याच्यात आपला सगळा वेळ आणि एनर्जी खर्च करायची.
कशासाठी? जर बायकोशी committed राहण्याइतकी integrity नव-याजवळ नसेल तर बायकोनी त्याच्या मागे मागे जात त्याला स्वतःशी बांधून का ठेवायचं? जाऊ देत ना... फिरू देत टिळा लावून सोडून दिलेल्या वळू सारखं...
आपल्या समाजात सगळीच कडे गृहीत धरलेलं आहे. पुरूषांच तो इतर बायकांकडे आकर्षित होणारच!
इतकी मोकळीक एका स्त्री ला आहे?
मागे मी एक कथा विशेषांक वाचला. अंकाचा विषयच sexuality असा होता. त्यात १५ कथांपैकी एक कथा सोडल्यास इतर सगळ्या कथांमधे पुरूष परस्त्रीकडे ओढला जातो असा विषय होता. आता मुळात परस्त्री आली म्हणजे यात स्त्री पण involved आहेच. पण कथा मात्र पुरुषाच्या angle नी लिहिलेली.
मधे एका मित्राकडून एक नवीनच "सुविचार" कळला... "पुरुषाचं सामर्थ्य हेच त्याचं सौंदर्य असतं आहे स्त्रीचं सौंदर्य हेच तिचं सामर्थ्य!"... क्या बात है! पुढे काही बोलायची गरजच नाही!

हे असंच स्त्रीला "स्वातंत्र्य" (पाहिजे तसं जगण्याचं) देण्याबाबत. मागे एक मित्र बोलता बोलता म्हणाला "मी माझ्या बायकोला पूर्ण स्वातंत्र्य देणार आहे." मी त्याला विचारलं "स्वातंत्र्य ’देणारा’ तू कोण?" तर तो उखडलाच, म्हणे मी दिलं नाही तर ते तिला कसं मिळणार?
स्वातंत्र्य ही काय पुरूषांनी ’स्त्री’ ला ’द्यायची’ गोष्ट आहे?
खरंच किती बेसिक level चे घोळ असतात लोकांच्या डोक्यात!

No comments:

Post a Comment