शब्द
ओठातले बोल शब्द
मनातले मौन शब्द
आनंद शब्दांचा जल्लोष
दुःख शब्दांचे अश्रू
जिव्हारी लागणारे शब्द
फुंकर घालणारेही शब्दच
नाती तोडतात शब्द
नाती जोडतातही शब्दच
निर्गूणाचे साकार रूप शब्द
अव्यक्ताचे व्यक्त रूप शब्द
विठूमाईचा सावळा रंग शब्द
तुकयाचा अभंग शब्द
ज्ञानदेवांची ओवी शब्द
भगवंताची गीता शब्द
विचारांची गुरफट शब्द
त्यातून बाहेरची वाटही शब्दच
शब्द सखे
शब्द सोबती
शब्द उदयाचे साक्षी
शब्द अस्ताचे सांगाती
माणूस आहे म्हणून शब्द आहेत,
की शब्द आहेत म्हणून माणसाचं माणूसपण?
ओठातले बोल शब्द
मनातले मौन शब्द
आनंद शब्दांचा जल्लोष
दुःख शब्दांचे अश्रू
जिव्हारी लागणारे शब्द
फुंकर घालणारेही शब्दच
नाती तोडतात शब्द
नाती जोडतातही शब्दच
निर्गूणाचे साकार रूप शब्द
अव्यक्ताचे व्यक्त रूप शब्द
विठूमाईचा सावळा रंग शब्द
तुकयाचा अभंग शब्द
ज्ञानदेवांची ओवी शब्द
भगवंताची गीता शब्द
विचारांची गुरफट शब्द
त्यातून बाहेरची वाटही शब्दच
शब्द सखे
शब्द सोबती
शब्द उदयाचे साक्षी
शब्द अस्ताचे सांगाती
माणूस आहे म्हणून शब्द आहेत,
की शब्द आहेत म्हणून माणसाचं माणूसपण?
No comments:
Post a Comment