Tuesday, 18 June 2013



 ही पोस्ट मी delete केली होती. ती परत पोस्ट करते आहे.
------------------------------------------------------------------------------
आज मी खूप दिवसांनी खूप हसले. मी, धन्या, पवन आणि अश्विनी भेटलो खूप दिवसांनी. आणि खूप भंकस केली. इतकं हसलो की शेवटी तोंड दुखायला लागलं. 
’पवनकुमार गुलाबराव पाटील’ (ज्यानी कोणी Where’s the party yaar हा movie बघितला असेल त्याला या नावातली गंमत नक्की कळेल) परत आलेत साक्षात US of the A वरून. तो अमेरिकेच्या तावडीतून सुटला याचा मला अत्यंत आनंद आहे. मग तो कसा subtly American झालाय यावर मी आणि धन्यानी त्याला खूप पिडलं. इतका उचकला बिचारा.
पवन आणि अश्विनी गेल्यावर मी आणि धन्या एका पेपर bag मधून जांभळं खात खात प्रभात रोडच्या गल्ल्यांमधून भटकत होतो. आणि आम्हाला दोघांना अशक्य हसू येत होतं की कसं लोकांना वाटत असेल आपण ‘couple’ आहोत! आणि कसे आपण सगळे घोळ घालत बसतो लायफात!
त्यांना भेटल्यावर मला एकदम माणसात आल्यासारखं वाटलं. आपल्यासारखेच घोळ आपली मित्रमंडळी पण लायफात घालतात हे बघून कसं बरं वाटतं. प्रत्येकाचा शोध वेगळा, प्रश्न वेगळे, विचारांची बैठक वेगळी, आयुष्याचा चष्माच वेगळा. आणि तरीही प्रत्येक जण एकमेकाचा सोबती. एकमेकांच्या वैचारिक आणि भावनिक घोळांचा वाटेकरी. जरा काही घडलं की वॅक करून सगळे एकमेकांकडे ओकून टाकतात. त्यामुळे ’तुला मी सांगितलं का?’ या प्रश्नाचं उत्तर कायमच ’हो. कधीच सांगितलंस’ असंच येतं.
निर्माणचं स्वप्न जरी नंतर आमच्यापासून दूर गेलेलं असलं तरी हे सगळे लोक मला आयुष्यात भेटल्याबद्दल मी देवाचे कायम आभार मानीन.

No comments:

Post a Comment