An Agricultural Testament वाचायला घेतल्यावर न राहून फुकुओकांच्या
’एका काडातून क्रांती’ ची आठवण झाली. आणि त्यातला माझा सगळ्यात आवडता उतारा मी परत
वाचायला घेतला…
मासानोबु फुकुओका ह्यांना अगदी तरूण वयात आलेल्या एका अनुभवाचं
वर्णन या उता-यात दिलं आहे. त्या वेळी ते योकोहोमा कस्टम्स ब्युरोच्या प्लॅंट इन्स्पेक्शन डिव्हिजनमधे काम करत होते आणि त्याबरोबरच प्रयोगशाळेत अमेरिकन आणि जपानी संत्रावर्गातील झाडांची खोडे, फांद्या आणि फळे यांचा नाश घडवून आणणा-या राळेवर संशोधन करत होते. तो उतारा असा-
“एके रात्री भटकत-भटकत मी एका
टेकडीवर पोचलो. समोर बंदर होते. मी थकून भागून गेलो होतो. अंगातील त्राणच संपल्यासारखे
झाले होते. अखेरीस एका मोठ्या झाडाच्या बुंध्याला टेकून मी पेंगू लागलो. मी तसाच पहाटेपर्यंत
पडून राहिलो. मला झोप लागली नव्हती आणि मी जागाही नव्हतो. मे महिन्याच्या १५ तारखेची
ती सकाळ होती हे मला अजूनही आठवते. तशाच सुन्न अवस्थेत बंदर उजळत जाताना मी पहात होतो.
मला सूर्य उगवताना दिसत होता आणि दिसत नव्हताही. वा-याचा झोत कड्याखालून उसळून वर येत
होता आणि एकाएकी धुके पांगले. त्याच क्षणी एक सारस पक्षी कुठूनतरी आला, त्याने एक तीक्ष्ण
आवाज केला आणि दूरवर उडून गेला. त्याच्या पंखांची फडफड मला ऐकू आली. एका क्षणात माझे
सारे संशय, माझ्या मनातील गोंधळाचे उदास धुके अंतर्धान पावले. ज्या ज्या गोष्टींवर
मी विसंबून होतो त्या सा-या वा-यावर उडून गेल्या. मला एकच गोष्ट कळली आहे असे मला वाटले.
माझ्या तोंडातून आपोआप शब्द आले ’ह्या जगात काहीच नाही आहे……’ मला काहीही समजले नाही
असे मला वाटले.
ज्या संकल्पनांना मी घट्ट धरून
होतो त्या सर्व, खुद्द अस्तित्वाविषयीची माझी संकल्पनाही केवळ पोकळ क्लुप्ती होती हे
मला दिसले. माझे मन हलके, स्वच्छ झाले. हर्षोन्मादाने मी नाचू लागलो. झाडावर लहान पक्षी
करीत असलेली चिवचिव कानी पडत होती आणि दूर उगवत्या सूर्याच्या प्रकाशात लाटा चमकत होत्या.
हिरवी, चमकदार पाने नाचत होती. हा खरा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे असे मला वाटले. मला ग्रासून
टाकलेल्या सगळ्या व्यथा स्वप्नांसारख्या, भ्रमासारख्या विरून गेल्या आणि ज्याला ’खराखुरा
निसर्ग’ म्हणता येईल तो माझ्यासमोर प्रकट झाला….”
किती विलक्षण अनुभव असेल हा! I think this is what they call
as ‘transformation’. Nothing of the old self remains…. A completely new being
takes shape…. Like butterfly from caterpillar.
मला पण असा life changing अनुभव घ्यायचाय…. आणि बदलून जायचंय… आजपर्यंत
मनावर गोळा झालेली भूतकाळाची ओझी, भविष्याची चिंता…. सगळं झुगारून देत मन स्वच्छ करायचंय….
पाण्यासारखं…. नितळ… आरसपानी… And I am sure some day it will happen to me… you
know why? Because I am seeking it…
No comments:
Post a Comment