Thursday, 2 July 2015

ग्रेस

क्षितिज जसे दिसते, तशी म्हणावी गाणी
देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी.
गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावे बुडता बुडता
सांजप्रवाही अलगद भरूनी यावे.

-ग्रेस

या ओळी कालपासून सोबत आहेत. अखंड.
ग्रेसच्या कवितांमधे असं काहीतरी आहे जे तुम्हाला थिजवून टाकतं. जागच्या जागी.
मुग्ध.
हिम्मत असेल तर धावत येऊन उडी मारायची त्या शब्दांच्या डोहात.
तितक्याच ताकदीनी.
नाहीतर मुकाट मागे फिरायचं.
शब्दही न बोलता.

मला तर त्यातलं फार कळतंही नाही.

मग तरी वेड का लागतं त्या शब्दांचं?
ग्रेस एक अनुभव म्हणतात तो हाच का?

No comments:

Post a Comment