Saturday, 10 December 2011

आबा


एका मित्रानी परवा ‘तोच चंद्रमा’ गाणं पाठवलं ईमेल वर.... आणि एकदम आबांची आठवण झाली. हे आबांचं आवडतं गाणं. आबा म्हणजे बाबांचे बाबा.
ते गायचे पण छान. त्यांचा आवाज खूप छान होता. पण त्यांना गाणं शिकायची वगैरे संधी नाही मिळाली.
पण ते सदानकदा गात असायचे. त्यांची आवडती गाणी म्हणजे हे- तोच चंद्रमा, झुंजूमुंजू झालं, वाटव्यांचं वारा फोफावला, एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात..... मला एवढी आठवतात... जी ते गात राहायचे.
त्यांचा आवाज सगळ्यात चांगला लागायचा तो म्हणजे बाथरूम मधे!! थंड पाण्यानी अंघोळ करायचे. मग हुडहुडी भरायची.... मग काय.... तानांवर ताना.... ते अंघोळ करताना दरवाजा लावयचे नाहीत. चट्टेरी पट्टेरी, नाडी असलेली मोठ्ठी चड्डी घातलेले आणि मोठ्यांदा गाणारे आबा.... हे चित्र मनावर कायमचं कोरंलेलं आहे. तेव्हा आमच्याकडे स्टीलचा तांब्या असायचा बादलीतून अंगावर पाणी घ्यायला.
त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी खूपच आठवतात. मी साधारण पाचवी-सहावी मधे असेन तेव्हा. 
त्यांना दुपारी साधारण 3-4 वाजता भूक लागायची. मग ते स्वयपाकघरात डब्बे उचकत बसायचे. आणि मग बर्‍याचदा शेंगदाणे मुठीत घेऊन खात बसायचे. मला खूप मजा वाटायची...
त्यांना पेपर मोठ्यानी वाचायची सवय होती. आणि पेपरातलं वाक्य तर सुरू नीट व्हायचं पण नंतर ते अम्म्म्म्म्......आणि शेवटी फक्त अssssssss एवढंच उरायचं.
ते पहाटे पहाटे पासून गायला लागायचे. त्यांचं पहाटेचं नेहमीचं गाणं म्हणजे-
झुंजू मुंजू झालं, चकाकलं समदं रान, पिगुन शान सोन्यावानी, हरपलं भान
मला या गाण्याचा आगापिछा काहीही माहित नाही. गूगल ला विचारायला हवंय.
आम्ही रिक्षात बसून कुठे चाललो असलो आणि बाजूनी ट्रक, किंवा बस किंवा तत्सम काही वाहन गेलं की आबा गडबडीनी आमची तोंडं दुसर्‍या दिशेला वळवायचे. त्या गाड्यांचा धूर नाकात जाऊ नाही म्हणून.
त्यांना उगीच जाऊन गळ्यात पडलं किंवा पाप्या घेतल्या की भयंकर राग यायचा. मग मी अनघा आणि मितू मुद्दाम त्यांच्या गळ्याला लटकायचो. ते आम्हाला काही बोलायचे नाहीत. पण त्यांची स्वगत बडबड सुरू व्हायची... काय सारखे मुके घेत बसतात....
आबांचा बेड म्हणजे विशेष जागा होती. आज्जी आणि आबांचे बेड्स एकाच रूम मधे समोरासमोरच्या भिंतींना लागून होते. आजीचा बेड एकदम स्वच्छ!! चादरीवर एकही सुरकुती नाही. आणि आबांचा बेड म्हणजे खूप सारा पसारा. आणि जरा गादी पायाच्या बाजूनी वर उचलली की भला मोठा खजीना!! कसली कसली कात्रणं....सुताचे गुंडे....कसली कसली बिलं....सेफ्टी पिना.....काय आणि काय....
त्यांनी अनेक चांगल्या लेखमाला किंवा क्रमशः येणार्‍या लहान मुलांच्या गोष्टींची सीरीजमधे कात्रणं कापून नीट जपून ठेवलेली होती....
ते वाण्याकडून आलेल्या पुड्यांचा दोरा नीट गुंडाळून त्याचा मोठ्ठा गुंडा करून ठेवायचे...तो क्रिकेटच्या बॉलपेक्षा मोठा असायचा.
आम्ही आबांबरोबर फुग्याची उडवाउडवी खेळायचो. म्हणजे ते त्यांच्या बेडवरून दोन्ही हात वापरून फुगा आमच्याकडे उडवायचे आणि आम्ही सगळ्या रूम भर उड्या मारत तो परत त्यांच्याकडे उडवायचो.
आबांचे वडील आजारी होते तेव्हा आबा मुंबईला ग्रॅंट रोडला नोकरी करायचे. त्यांच्या बाबांनी शेवटच्या दिवसात त्यांना परत पिंपळगावला बोलवलं. तेव्हा आबा नोकरी सोडून आले. आणि सगळी आर्थिक घडी विस्कटली. ती मग बाबा, आक्काई, माधु आत्या सगळे मोठे होइपर्यंत नीट बसलीच नाही. पण आज्जी खंबीर होती. तिनी शाळेत शिक्षिकेची नोकरी करत सगळ्यांना शिकवलं. त्यामुळे आमच्या घरात आज्जीच डिसिजन मेकर होती.
आबांना बाबा वगैरे सगळे दादा म्हणायचे आणि आज्जीला ताई. आबा आजीला ताईसाहेब म्हणून हाक मारयचे. किंवा ‘अगं ए’.... पण नाव घेऊन कधीच नाही.
त्या दोघांचे संवाद विशेष ऐकण्यासारखे असायचे. आज्जी ठार बहिरी. एकदा मी त्या दोघांच्या बेडच्या मधे गादी घालून झोपले होते. आबांनी आज्जीला विचारलं गॅस नोंदवला का?, त्यावर आज्जीचं उत्तर- व्याज? कसलं व्याज??
माझ्यासाठी हार्मोनियम घेतली तेव्हा आबाच कसले खूष झाले होते. मग बरेच दिवस मला वेगवेगळे सूर दाबायला सांगून त्यांची पट्टी शोधायचा प्रयत्न केला होता. आबांनी विचारलं की काय गं, पांढरी दोन वाटतीये का? की मी लगेच हो हो, पांढरी दोनच वाटतेय. पांढरी काय आणि दोन काय. कोणालां कळत होतं?? पण आम्ही दोघं ती पेटी घेऊन बळंच आ-ऊ-टा-टू करत बसायचो.
तेव्हा- म्हणजे back in 80s आबांनी स्वतःचा स्वतः होमिओपथीचा अभ्यास केला होता. त्यांच्या कपाटात खूप सारी औषधं पण होती. महात्मा नगरमधले बरेच जण औषधासाठी यायचे आबांकडे. आबांनी लोकांचे टॉंसिल्स बरे केले, त्यांची ऑपरेशंस टळली असं काय काय आम्हाला ऐकायला मिळायचं. आमच्या आजारपणात पण हमखास आबांचंच औषध.
मला आणि अनघाला घ्यायला रिक्षा यायची. मी कायम उशीर करणार. मग आबांचं बीपी वाढणार. शेवटी उजूआत्या आमच्या शाळेच्या वेळात त्यांना गणपती मंदिरात नाहीतर वाचनालयात पाठवून द्यायची.
त्यांना विशेष मित्र असे नव्हतेच. पण शेवटी शेवटी मात्र त्यांचा जेष्ठ नागरिक मंडळाचा मोठा ग्रुप जमला होता. ते सगळे जण प्रत्येकाच्या वाढदिवशी त्या त्या माणसाकडे गुलाबाचं फूल घेऊन जायचे. आबांच्या शेवटच्या वाढदिवशी आमच्याकडे पण आले होते. आबांनी ‘एकवार पंखावरूनी, फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे, तुझ्या अंगणात’ म्हटलं होतं. ते मी ऐकलेलं आबांचं शेवटचं गाणं.
त्यानंतर थोडे दिवसात आज़्जी गेली. आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी आबा पण. हार्ट ऍटॅक आला त्यांना. आज्जीचं जाणं बहूदा सहन करू शकले नाहीत. पण एका परीनं बरं झालं. त्यांना एकटं जगायला अवघड गेलं असतं फारच.
त्यानंतर आम्हाला खूपच अवघड गेलं सगळ्यांना. रोजची सवय असलेले आज्जी आबा नाहीतच एकदम... 
आबा असे bits and pieces मधे आठवत राहतात. कदाचित आबांचं व्यक्तिमत्वाचं पहिलं impression जरा messy असं होत असेल. पण he was such a gem... 
कशी मजा असते ना. ह्या सगळ्या आणि अजून अनेक आठवणी या डोक्याच्या खोक्यात बंद आहेत. एका गाण्याच्या निमित्तानी उसळी मारून वर आल्या. एरवी कुठल्या तरी कोपर्‍यात पडून असतील....

Thursday, 24 November 2011

I was seeing the trailer of Dewarists on youtube.
It features the host of the show Monica Dogra with her song.
In her interview she says... "Every person on this planet has a unique thumb print... A unique personality....Its not about being the best.... Its never been.... I started to do well when I understood it was not about being the best person in the world... It was about being ....me..."

How true...

Saturday, 19 November 2011

खूपच सुंदर सकाळ आहे. अगदी टिपिकल थंडातली. मी आत्ताच आकाश दर्शनाचा कार्यक्रमाला जाऊन आले.

It was quite an experience. चांदण्यांचं खच पडलेलं आकाश, दुर्बीण आणि शिवाय simulation software. अजून काय हवं?
जोतिर्विज्ञान संस्थेचे ते काका मन लावून काय काय दाखवत होते. आजूबाजूला काही लोकं मस्त गवतात पहुडली होती. मला पण गवतात आडवं पडायची अनिवार इच्छा झाली. पण नेहमीप्रमाणे...बरं दिसणार नाही....ते काका एवढं सागतायत ...त्यांना कसं वाटेल....शिवाय ते काय सांगतायत ते ऐकू येणार नाही....मग कळणार कसं....डोक्यात दळंण सुरू!!! हा सगळा दिव्य शाळा आणि त्यातली सगळ्य़ा गोष्टींसाठी केलेली शिक्षा...याचा परिणाम आहे....आपण मोकळा श्वास घ्यायलाच घाबरतो....
शेवटी म्हटलं मारो गोली....त्यांना वाटायचं ते वाटू देत....आणि काही नाही समजलं तरी चालेल...मला आत्ता गवतात झोपून आकाश बघायचं so I am going to do it....
आणि..... गवतात झोपून बघितलेलं ते आकाश....it was just out of the world experience...
It just touched something deep inside....
The beauty....the magnificence....
aahhhhh
That image is still carved out in my mind...
ते अनुभवता अनुभवता...कोण काय म्हणेल.... त्या इंस्ट्रक्टर काकांना कसं वाटेल...सगळं दळण डोक्यातून हद्दपार झालं....उरला तो फक्त एक तरल अनुभव....

Wednesday, 2 November 2011

Winter :)

When the bold branches
Bid farewell to rainbow leaves -
Welcome wool sweaters.
-B. Cybrill

Saturday, 29 October 2011

कमळ-द-पारसनीस
म्हणजे...माझी आज्जी...
वय वर्ष 83. उंची साधारण साडेचार फूट
कानाला यंत्र लावावं लागतं आणि दाताला कवळी.
तर या आज्जी बरोबरचे काही संवाद
-------------------------------------------------------------------------
मी आज्जीचं नाक ओढते
आज्जी- 80 व्या वर्षी काही मोठं होणार नाहीये. नकटं ते नकटंच राहणार आहे नाक.
मी- अगं पण मग मला मुलांनी नापसंत केलं तर? म्हटले ही मुलगी नको, हिची आज्जी नकटी आहे तर?
आज्जी- मग मी येतच नाही ना समोर. म्हणजे प्रश्नच मिटला
-------------------------------------------------------------------------
आज्जी माझ्या खोलीत येते. माझ्या खोलीत एका कोपर्‍यात बर्‍याच प्लास्टिकच्या पिशव्या पडल्या आहेत. कशात जुने गिफ्ट रॅपिंग पेपर्स, कशात अजून प्लास्टिकच्या पिशव्या, कशात पेपर बॅग्स इ.इ.
आज्जी चिंतेनी त्याकडे बघते.
आज्जी- अमृता...आपण असं करूयात...एक मोठं पोतं  घेऊ. आणि मग हे सगळं त्यात कोंबून ते वर ठेवून देऊ. कशी वाटते आयडिया?
मी- चालेल आणि तुला पण त्या पोत्यात बसवून वर ठेवून देऊ.
आज्जी- चालेल. मी आपली बघत बसीन वरून इकडे तिकडे
-------------------------------------------------------------------------
भारत मॅट्रिमोनी वर रिक्वेस्ट आलेल्या एखाद्या मुलाचा फोटो मी आज्जीला दाखवते
आज्जी- मला पसंत आहे मुलगा.
मी- मग तू करतेस का त्याच्याशी लग्न?
आज्जी- चालेल सांग त्याला. आज्जीला पसंत आहेस तू. (आणि मग मला पाठीवर एक धपाटा घालत) आजकाल फार फाजिल होत चालली आहेस बरं का तू...
---------------------------------------------------------------------------
 अनघा अमेरिकेहून व्हिडिओ चॅट करतेय
आज्जी येते.
अनघा- whats up aajji??
आज्जी- (माझ्याकडे बघून) काय म्हणतिये ग ती?
मी- Whats up??
आज्जी- आपल्याला नाही बुवा कळत
मी- अगं तुला शिकवलंय की काय म्हणायचं ते. Nothing much
आज्जी- (अनघाकडे बघून) nothing much
(अनघा आणि मी खो खो हसत स्क्रीन वर टाळी देतो)
--------------------------------------------------------------------
मी चहा ओततेय. 2 पैकी एका कपाला थोडा तडा गेलाय.
आज्जी- तो फुटका कप आईला नाहीतर मला दे बरं का. बाबांना देऊ नकोस.
मी- !!!!!!!!!!!!का????????
आज्जी- पुरुषांना  फुटके कप देत नाहीत.
मी- !!!!!!!!!!!!!!!का??????
आज्जी- तुला सासरी गेल्यावर कळेल.
(माझा <give up> होतो)
----------------------------------------------------------------------------------

Friday, 28 October 2011

Today I met Prats after a long time. She visited India after a long.
She has been in UK for quite a while now. She is a classic case of Indian kids raised abroad.
She was partly raised there and partly in India.
We share so much in common. Most of it stems from the way we were brought up, the way our families function.
And its strange, but our thinking, which is on similar lines.
The latest thing on both of our minds is...we are seeking for our space....and our families feel we are not listening to them...at all!!
The issue comes up in various things like choosing our education...choosing career or choosing life partner...how we should dress...whom we should be friends with....
I dont know...its like they dont approve of our logic and we dont approve of theirs..
Most of the time what they want us to opt for is like a secure option....something which has been tried and tested enough...like may be engineering or medical...you know....
For everything we choose, they have some better (safer) option to suggest... and right now we really dont want suggestions...dont want anything ready on platter.... we just want to explore...try...make mistake...learn
But they somehow think that they own us I guess....the acceptance that we are grown up individuals and we can and we should take our decisions....that let go of us to certain extent just doesnt come to them....
Or may be.....its just that our generation is more self centred...I am afraid I am generalising a bit too much... but this impression has been gathered from observing a lot of my friends and myself
I mean if my mom dad wouldnt have compromised upon all the freedom that they wanted, I am sure I wont be in a position to be able to seek whatever space that I seem to be looking for. They also would have loved to explore and try things but they focused on stability. And they earned it hard way enough.
I guess we (the children gen) all lack that much patience, tolerance, tenacity, perseverance....
And I even end up thinking that we are not doing justice to all the close relations...
But then surrendering to the ideas  which we dont believe in....is too much to ask for from ourselves
I wish our society encouraged more thinking and was more open to questions....and didnt ask everyone to follow everything just blindly and I wish what we chose after giving our version of thoughts was accepted more openly...