Monday, 20 August 2012

आज मी खूप दिवसांनी स्वाध्याय केंद्राला गेले. जवळजवळ वर्षभरानी.

मधल्या काही काळात मला माझी space हवी होती.
गेल्या २-३ वर्षांपासून जे बघतेय, जे अनुभवतेय ते पचवायचं होतं. त्यात अनेक philosophies होत्या, ideologies होत्या, अनेक paradigms होते, वेगवेगळ्या frames of references होत्या, अनेक लोक होते, त्यांचे वेगेळेवेगळे attitudes होते, अनेक प्रसंग होते....
अनेक दिवस डोकं भणभणलं.....काय चूक काय बरोबर काय चांगलं काय वाईट काय rational काय irrational....पण हळू हळू अनेक fallacies लक्षात यायला लागल्या...

Finally ते सगळं बघून म्हटलं boss हे काही खरं नाही. दादांकडून जे आपल्याला मिळालंय, मिळतंय ते जास्त fundamental आणि महत्वाचं आहे.

आज केंद्रात गेल्यावर खूप प्रवास करून दमून गेल्यावर परत घरी आल्यावर जसं वाटतं तसं वाटलं.

अनघा आणि माझी कायमची रड असायची. की स्वाध्यायमधे आमच्या पिढीत फार intellectual कोणी नाहीत. त्यामुळे एक दादांची प्रवचनं सोडलं तर बर्‍यापैकी bore होतं....rapo build होत नाही....जे बाबांच्या पिढीत जमून आलं. त्यांना त्यांच्याच caliber चे अनेक मित्र मिळाले आणि कामाची मजा अनुभवता आली.

पण गेल्या ३-४ वर्षात जे जे अनुभवलं, बघितलं ते बघून असं वाटलं की भले इथे लोक फार intellectuals नसतील पण ते खूप साधे आणि सरळ आहेत. आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी strength आहे.
खोटा अहं नाही, दंभ नाही, आत एक बाहेर एक नाही, जग बदलायचा आव नाही....
इथे कदाचित तेवढी rationality नसेल, भाबडेपणा असेल, पण इथे विचारांची निर्मळता आहे. Purity of motives आहे.... माणूसपण आहे... वागण्यातला निखळपणा आहे
आणि दादांनी जो रस्ता दाखवला त्यावर मनापासून चालायची इच्छा आहे...ताकद आहे.
आणि तो रस्ता इतका पक्का आहे...चांगल्या वाईटाची reference line इतकी पक्की आहे की आम्ही कोणीही ठरवलं तरी भरकटणार नाही. आजच्या so called भक्तीच्या पूरात वाहून जाणार नाही.

दादांनी लावलेली बीजं आहेत. आंब्याच्या झाडाला सफरचंद थोडीच लागणार?? :)

Thursday, 9 August 2012

पाऊस....गुलज़ारांच्या कवितेतला...

५ ऑगस्टच्या लोकरंग मधे गुलज़ारांच्या पावसाच्या कवितांवर लेख होता.
त्यातल्या मला आवडलेल्या काही कविता.

शाखों पे पत्ते थें
पत्तों पे बूंदे थी
बूंदो में पानी था.....
......पानी मे आंसू थे....

********

रुकती है, थमती है, कभी बरसती है
बादल पे पांव रखे, बारिश मचलती है

********

मोती मोती बिखर रहा है गगन
पानी पानी है, सब पिघलने दो
मेंहा बरसने लगा है आज की रात
आज की रात मेंहा बरसने दो.....

********

पलकों पर एक बूँद सजाए
बैठी हूँ सावन ले जाए
जाए, पी के देश में बरसें
इक मन प्यासा, इक मन तरसे.....

********

-गुलज़ार

Friday, 3 August 2012

Terrorism at doorstep

मी मुंबईत असताना चेंबूरला राहायचे. माझं office दादरला होतं.
प्रिया बरेच वेळा माझ्याकडे राहायला यायची. ती पुण्यात काम करायची. पण तिचं बर्‍याचदा VT ला office चं काम असायचं. साधारण २-३ महिन्यातून एकदा तरी चक्कर असायचीच.
एकदा ती आली असताना आम्ही उशिरापर्यंत गप्पा मारून झोपलो. पहाटे साधारण ६ ला प्रियाचा फोन वाजला.
पुण्याहून तिच्या जिजाजींचा फोन होता. म्हणाला मुंबई red alert वर आहे. आज चुकूनही बाहेर पडू नका. VT स्टेशनला दहशतवाद्यांनी firing केलं आहे. आणि ताज वर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.
झालं.
आमची झोप खाडकन उडाली.
घाईघाईनी जाऊन TV on केला.
सगळ्या channels वर तेच चालू होतं.
मग दिवसभर घरीच होतो.
दिवसभर TV बघत बसलो.

तेव्हा ते बघताना वाटत होतं, की हे VT ला चालू आहे. म्हणजे आपल्यापासून बरंच लांब. दूर कुठेतरी.
एक तर दहशतवादी हल्ला ही घटना मनानी accept करताना पण दुसर्‍या जगातलीच वाटते.

आणि परवा असाच TV लावून बघत बसलो होतो.
पुण्यातले bomb blasts.
या वेळी TV वर जे चित्र दिसत होतं ते माझ्या घरापासून ५ मिनिटावर असलेल्या जागांवरचं होतं.

संशयीत म्हणून ज्याला अटक केलीये तो आमच्या इस्त्रीवाल्याच्या दुकानात कामाला होता. रफू करून द्यायचा. तिथे बाहेरच शिवणाचं मशीन घेऊन बसलेला असायचा.

अजूनही विश्वास बसत नाही.
Terrorism at doorstep.

म्हणायला आम्ही डेक्कन ला राहतो. पुण्यातल्या so called elite भागात. कसलं elite आणि कसलं काय. कुठेली जागा सुरक्षित म्हणून राहिलेली नाही.

कुठे चाललंय हे सगळं?? कसला अट्टाहास आहे हा?? bomb blasts करून, लोकांना जीवे मारून काय सिद्ध करायचंय यांना??