Friday, 3 August 2012

Terrorism at doorstep

मी मुंबईत असताना चेंबूरला राहायचे. माझं office दादरला होतं.
प्रिया बरेच वेळा माझ्याकडे राहायला यायची. ती पुण्यात काम करायची. पण तिचं बर्‍याचदा VT ला office चं काम असायचं. साधारण २-३ महिन्यातून एकदा तरी चक्कर असायचीच.
एकदा ती आली असताना आम्ही उशिरापर्यंत गप्पा मारून झोपलो. पहाटे साधारण ६ ला प्रियाचा फोन वाजला.
पुण्याहून तिच्या जिजाजींचा फोन होता. म्हणाला मुंबई red alert वर आहे. आज चुकूनही बाहेर पडू नका. VT स्टेशनला दहशतवाद्यांनी firing केलं आहे. आणि ताज वर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.
झालं.
आमची झोप खाडकन उडाली.
घाईघाईनी जाऊन TV on केला.
सगळ्या channels वर तेच चालू होतं.
मग दिवसभर घरीच होतो.
दिवसभर TV बघत बसलो.

तेव्हा ते बघताना वाटत होतं, की हे VT ला चालू आहे. म्हणजे आपल्यापासून बरंच लांब. दूर कुठेतरी.
एक तर दहशतवादी हल्ला ही घटना मनानी accept करताना पण दुसर्‍या जगातलीच वाटते.

आणि परवा असाच TV लावून बघत बसलो होतो.
पुण्यातले bomb blasts.
या वेळी TV वर जे चित्र दिसत होतं ते माझ्या घरापासून ५ मिनिटावर असलेल्या जागांवरचं होतं.

संशयीत म्हणून ज्याला अटक केलीये तो आमच्या इस्त्रीवाल्याच्या दुकानात कामाला होता. रफू करून द्यायचा. तिथे बाहेरच शिवणाचं मशीन घेऊन बसलेला असायचा.

अजूनही विश्वास बसत नाही.
Terrorism at doorstep.

म्हणायला आम्ही डेक्कन ला राहतो. पुण्यातल्या so called elite भागात. कसलं elite आणि कसलं काय. कुठेली जागा सुरक्षित म्हणून राहिलेली नाही.

कुठे चाललंय हे सगळं?? कसला अट्टाहास आहे हा?? bomb blasts करून, लोकांना जीवे मारून काय सिद्ध करायचंय यांना??

No comments:

Post a Comment