Tuesday, 11 March 2014

Beggar girl and the stray dogs...

Something happened today that has stayed in my mind like a frozen moment...

Me, Sajal and Shastri were standing near Cafe Goodluck ...
We were discussing about dams... Shastri has been working with Shashwat (an NGO working near Manchar, Pune). He was talking about the kind of issues the displaced families of Dimbhe dam are facing... These families are kaatkaries..  i.e. tribal... they have no proof of existence what so ever... and so are easily brushed away from the farce of rehabilitation and resettlement... the R&R process typically needs proof of owning a land to get a compensation... now-- these tribal have no proof of even their existence.... how are they supposed to have proof of owning a land?
Then Sajal was talking about Gosikhurd dam in Vidarbha... the dam was built 30 years back... and the struggle of nearly 16000 displaced families is still going on....
The development that we see around... owning to which urban residents enjoy much comfort and luxuries... stands essentially on lives of too many of such vulnerable families having to give up everything almost at a gun point... of the Government...

We were talking for long time... all this while 4-5 stray dogs were roaming around in the lane....
Suddenly all of them ganged up.... and started howling... alarmed we turned our heads... and saw that a very small fragile beggar girl was walking down and the dogs were about to attack her...the girl was so small and frail...she shuddered for a moment and was screaming with fear...

Shastri ran after the dogs with stones in his hand... the dogs fled... the girl was relieved....

What we witnessed in that quarter of a minute was exactly what we were talking about... Resemblance between the frail girl and the kaatkaries uprooted from their land was uncanny...

The talk resumed...and after a while we parted ways.... but I am still stuck at that frozen moment....
The small frail girl screaming with fear... and gang of dogs all set to tear her down....

Tuesday, 11 February 2014

आजकाल पुण्यात पेपरमधे एका नाटकाची जाहिरात येते "चला कामजीवन जगूया". आणि त्याची tagline अशी आहे- "बायकोने आकर्षक दिसण्याचा प्रयत्न केला तर काय बिशाद नव-याची नजर दुस-या बायकांकडे जाईल!".
या वाक्यात किती बेसिक लेव्हलचा प्रॉब्लेम आहे हे किती लोकांना कळतं माहित नाही. नाटक काढणा-यांना नक्की कळलेलं नाहीये.
म्हणजे आपल्या नव-याला आपल्याशी बांधून ठेवायला बायकोनी जिवाचा आटापिटा करायचा, सुंदर दिसायचं. शाश्वताचा शोध न घेता जे शरीर नश्वर आहे  त्याच्यात आपला सगळा वेळ आणि एनर्जी खर्च करायची.
कशासाठी? जर बायकोशी committed राहण्याइतकी integrity नव-याजवळ नसेल तर बायकोनी त्याच्या मागे मागे जात त्याला स्वतःशी बांधून का ठेवायचं? जाऊ देत ना... फिरू देत टिळा लावून सोडून दिलेल्या वळू सारखं...
आपल्या समाजात सगळीच कडे गृहीत धरलेलं आहे. पुरूषांच तो इतर बायकांकडे आकर्षित होणारच!
इतकी मोकळीक एका स्त्री ला आहे?
मागे मी एक कथा विशेषांक वाचला. अंकाचा विषयच sexuality असा होता. त्यात १५ कथांपैकी एक कथा सोडल्यास इतर सगळ्या कथांमधे पुरूष परस्त्रीकडे ओढला जातो असा विषय होता. आता मुळात परस्त्री आली म्हणजे यात स्त्री पण involved आहेच. पण कथा मात्र पुरुषाच्या angle नी लिहिलेली.
मधे एका मित्राकडून एक नवीनच "सुविचार" कळला... "पुरुषाचं सामर्थ्य हेच त्याचं सौंदर्य असतं आहे स्त्रीचं सौंदर्य हेच तिचं सामर्थ्य!"... क्या बात है! पुढे काही बोलायची गरजच नाही!

हे असंच स्त्रीला "स्वातंत्र्य" (पाहिजे तसं जगण्याचं) देण्याबाबत. मागे एक मित्र बोलता बोलता म्हणाला "मी माझ्या बायकोला पूर्ण स्वातंत्र्य देणार आहे." मी त्याला विचारलं "स्वातंत्र्य ’देणारा’ तू कोण?" तर तो उखडलाच, म्हणे मी दिलं नाही तर ते तिला कसं मिळणार?
स्वातंत्र्य ही काय पुरूषांनी ’स्त्री’ ला ’द्यायची’ गोष्ट आहे?
खरंच किती बेसिक level चे घोळ असतात लोकांच्या डोक्यात!

Sunday, 9 February 2014

I am like......



Today I had gone for a session of “Diploma in Experiential Education & Practice” or DEEP as they call it. As the name suggests it is about how to facilitate experiential education amongst a group of people of any kind. I learned about it from a friend of mine. The instructor is generous enough to keep it informal so that anyone can simply walk in.
Today’s topic was use of drama or acting or theatre in education.
The visiting faculty who was from background of theatre of oppressed took all the participants through a series of games, improvisations etc.
At the end of session he asked us to write minimum three metaphors for ourselves. An image- how we perceive ourselves….
Here’s what I wrote-
I am—
Like a bird wanting to take a leap
Like a bunch of words that are waiting to become a verse
Like a canvas that is being painted
Like a camera film that has various impressions
Like web of too many strands entangled in a chaos
Like an order emerging through the chaos

Sunday, 6 October 2013

कधी एकदा

कधी एकदा
अनंत अथांग आकाशाखाली
उत्तर दक्षिण गिरकी घेउन
वाहत भरारा म्हणाला वारा:
जीर्ण विचारांची, जीर्ण संकेतांची
वाहून नेऊन सुकली पाने
निर्मळ मोकळी करितो राने

तोच खळाळत, धुंद उसळत
नदी धावली आणि म्हणाली:
लोकमाता मी
लोकसेवेचे माझे हे व्रत
जाते मी वाहत आणि फुलवित
काठाकाठांनी
दोन्ही हातांनी
फुलांची, फळांची समृद्ध सृष्टी
स्पर्शात माझिया अमृतवृष्टी

तोच कडाडत, गर्जत गर्जत
वदली त्वेषात जळत विद्युत-
मूर्तिभंजक मी जागृत तमी
करून प्रहार
भेदिते अंधार
माझीच शक्ती
देतसे मुक्ती
जीर्ण आकारांस! जीर्ण प्रतिमांस!

बाजूस कोठे लपून होते
हिरव्या तृणात फूल इवले
उभे एकले!
वनपरीचे स्वप्नच जणू तिच्या नकळत मागे राहिले
आणि उमलले!
इंद्रधनुष्यच अथवा लाजरे
भूमीला स्फुरले!
रंगांच्या कोवळ्या जाहल्या पाकळ्या!

ऐकून नदीचे वायूचे शब्द
निश्चल निःशब्द फूल इवले
उभे राहिले!
तयास वाटले काही बोलावे
हृद्गत आपुले सांगावे
अधीर लाज-या अधरांमधून
फुटेना शब्द,
फूल इवले शांत निःशब्द!

तयाचे हृद्गत ऐकण्यासाठी
थांबला जरा खट्याळ वारा
थांबली बिजली, नदीही थांबली
आतुर दिशाही जाहल्या दाही!

थरथरल्या तोच पाकळ्या
साठविलेले सारे मनातले
उचंबळले
अनंत अथांग आकाशाखाली
गंधित मौनास इवल्या फुलाच्या
फुटला अंकूर कोवळ्या स्वराचा
सारे साठवून
सारे आठवून फूल म्हणाले
"उमलते मी........उमलते मी."

-मंगेश पाडगावकर

Thursday, 19 September 2013

Transformed...



An Agricultural Testament वाचायला घेतल्यावर न राहून फुकुओकांच्या ’एका काडातून क्रांती’ ची आठवण झाली. आणि त्यातला माझा सगळ्यात आवडता उतारा मी परत वाचायला घेतला…
मासानोबु फुकुओका ह्यांना अगदी तरूण वयात आलेल्या एका अनुभवाचं वर्णन या उता-यात दिलं आहे. त्या वेळी ते योकोहोमा कस्टम्स ब्युरोच्या प्लॅंट इन्स्पेक्शन डिव्हिजनमधे काम करत होते आणि त्याबरोबरच प्रयोगशाळेत अमेरिकन आणि जपानी संत्रावर्गातील झाडांची खोडे, फांद्या आणि फळे यांचा नाश घडवून आणणा-या राळेवर संशोधन करत होते. तो उतारा असा-

“एके रात्री भटकत-भटकत मी एका टेकडीवर पोचलो. समोर बंदर होते. मी थकून भागून गेलो होतो. अंगातील त्राणच संपल्यासारखे झाले होते. अखेरीस एका मोठ्या झाडाच्या बुंध्याला टेकून मी पेंगू लागलो. मी तसाच पहाटेपर्यंत पडून राहिलो. मला झोप लागली नव्हती आणि मी जागाही नव्हतो. मे महिन्याच्या १५ तारखेची ती सकाळ होती हे मला अजूनही आठवते. तशाच सुन्न अवस्थेत बंदर उजळत जाताना मी पहात होतो. मला सूर्य उगवताना दिसत होता आणि दिसत नव्हताही. वा-याचा झोत कड्याखालून उसळून वर येत होता आणि एकाएकी धुके पांगले. त्याच क्षणी एक सारस पक्षी कुठूनतरी आला, त्याने एक तीक्ष्ण आवाज केला आणि दूरवर उडून गेला. त्याच्या पंखांची फडफड मला ऐकू आली. एका क्षणात माझे सारे संशय, माझ्या मनातील गोंधळाचे उदास धुके अंतर्धान पावले. ज्या ज्या गोष्टींवर मी विसंबून होतो त्या सा-या वा-यावर उडून गेल्या. मला एकच गोष्ट कळली आहे असे मला वाटले. माझ्या तोंडातून आपोआप शब्द आले ’ह्या जगात काहीच नाही आहे……’ मला काहीही समजले नाही असे मला वाटले.

ज्या संकल्पनांना मी घट्ट धरून होतो त्या सर्व, खुद्द अस्तित्वाविषयीची माझी संकल्पनाही केवळ पोकळ क्लुप्ती होती हे मला दिसले. माझे मन हलके, स्वच्छ झाले. हर्षोन्मादाने मी नाचू लागलो. झाडावर लहान पक्षी करीत असलेली चिवचिव कानी पडत होती आणि दूर उगवत्या सूर्याच्या प्रकाशात लाटा चमकत होत्या. हिरवी, चमकदार पाने नाचत होती. हा खरा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे असे मला वाटले. मला ग्रासून टाकलेल्या सगळ्या व्यथा स्वप्नांसारख्या, भ्रमासारख्या विरून गेल्या आणि ज्याला ’खराखुरा निसर्ग’ म्हणता येईल तो माझ्यासमोर प्रकट झाला….”

किती विलक्षण अनुभव असेल हा! I think this is what they call as ‘transformation’. Nothing of the old self remains…. A completely new being takes shape…. Like butterfly from caterpillar.
मला पण असा life changing अनुभव घ्यायचाय…. आणि बदलून जायचंय… आजपर्यंत मनावर गोळा झालेली भूतकाळाची ओझी, भविष्याची चिंता…. सगळं झुगारून देत मन स्वच्छ करायचंय…. पाण्यासारखं…. नितळ… आरसपानी… And I am sure some day it will happen to me… you know why? Because I am seeking it…

Saturday, 14 September 2013

Starry Starry Night.....



Starry, starry night
Paint your palette blue and gray
Look out on a summer's day
With eyes that know the darkness in my soul
Shadows on the hills
Sketch the trees and the daffodils
Catch the breeze and the winter chills
In colors on the snowy linen land

Now I understand
What you tried to say to me
How you suffered for your sanity
How you tried to set them free
They did not listen, They did not know how
Perhaps they'll listen now

Starry, starry night
Flaming flowers that brightly blaze
Swirling clouds in violet haze
Reflect in Vincent's eyes of china blue
Colors changing hue
Morning fields of amber grain
Weathered faces lined in pain
Are soothed beneath the artist's loving hand

For they could not love you
But still your love was true
And when no hope was left inside
On that starry, starry night
You took your life as lovers often do
But I could have told you Vincent
This world was never meant for one as
beautiful as you

Starry, starry night
Portraits hung in empty halls
Frame less heads on nameless walls
With eyes that watch the world and can't forget
Like the strangers that you've met
The ragged men in ragged clothes
The silver thorn of bloody rose
Lie crushed and broken on the virgin snow
Now I think I know
What you tried to say to me
How you suffered for your sanity
How you tried to set them free
They did not listen they're not listening still
Perhaps they never will

-Vincent, by Don McLean

---------------------------------------
P.S. I was just too happy to have a print of this legendary painting hanging in my living room. While I was eagerly sharing this picture I felt like listening to this song by Don McLean, and well... the lyrics made me little low....

Monday, 9 September 2013

बाप्पा मोरया

नेमेची गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. Whatsapp वर एकेक सुगरण मैत्रीणींनी केलेल्या मोदकांचे photos येताहेत. त्यांची कौतुकं चालू आहेत..... recipes share करणं चालू आहे (हो whatsapp वर!)

आणि नेहमीप्रमाणेच मी हिरमुसून बसली आहे.

आमच्या घरी गणपती बसत नाही. हे माझं फार लहानपणापासूनचं दु:ख आहे. आणि यावरून मी आई बाबांचं अजून सुद्धा डोकं खाते. आमचा गणपती family tree मधे कुठेतरी हरवला आहे. म्हणे गणपती मोठ्या मुलाकडे बसवण्याची पद्धत आहे. आणि माझे पणजोबा किंवा खापरपणजोबा बहूदा छोटे भाऊ असावेत. म्हणून आमचा गणपती कालौघात हरवला. अजूनही त्याचा माग ठरवला तर काढता येईल. पण ते घर किती अनोळखी असेल. मग तिथला गणपती तरी ओळखीचा, आपला, माझा कसा वाटणार?

घरी गणपती बसवावा म्हणून लहानपणी मी अनेकदा रडून गोंधळ घातलेला मला चांगला आठवतो. पण आई बाबांनी कधीही हो म्हटलं नाही. म्हणे असा मधेच आपल्या मनाला वाटेल तसा गणपती बसवायला सुरू करता येत नाही. पण मी असे अनेक लोक बघितलेत की ज्यांनी स्वतःहून परंपरा वगैरे नसताना गणपती आणायला सुरुवात केली. त्यातलीच एक माझी आत्या. नाशिकलाच राहणारी. मग गणपतीत मी अनघा आणि मितालीचा मुक्काम आत्याकडे असायचा. दादा म्हणजे माझा आतेभाऊ कमालीचा artist. मग त्याच्याबरोबर (खरं म्हणजे त्याच्या मधे मधे करत) आम्ही पण आरास करायला मदत करायचो. thermocol कापून दे, कागदंच चिटकव, चमकीच लाव, वायरच तोडून दे हे असं सगळं आम्ही अगदी उत्साहात करायचो. एकीकडे आत्याची स्वयंपाकाची गडबड असायची. पंचामृत, mix भाजी, उकडीचे मोदक असं सगळंच. गणपती बसवून नंतर घरी यायला नको वाटायचं. उदास उदास वाटायचं. मग आई बाबांशी भांडण... पण आपल्याकडे गणपती का नाही?????

जसा आत्याकडचा गणपती हा त्यातल्या त्यात solace होता तसंच आणखी एक गोष्टीमुळे हे दुःख विसरायला व्हायचं. ते म्हणजे आमच्या महात्मानगरचं गणपती मंदीर. महात्मा नगर हे एक अतिशय planned neighbourhood होतं. साधारण तीनेक square km चा area असेल. व्यवस्थीत काटकोनात रस्ते, आखीव रेखीव आयताकृती बंगले किंवा buildings साठी plots आणि बरोबर मध्यभागी खेळायला भलं मोठं ground. त्याच्याच बजूला गणपतीचं मंदीर आणि एक घसरगुंडी झोके सी-सॉ इ. असलेली बाग आणि त्याच्या बाजूला वाचनालय. आम्ही १९८७ ला रहायला गेलो तेव्हा हे सगळं नुकतंच वसत होतं. मी तेव्हा ३ वर्षाची होते. हळूहळू जसं महात्मानगर occupy व्हायला लागलं तसं माझ्या वयाची, माझ्याहून मोठी, छोटी अशी अनेक वयोगटांची लहान मुलं आमच्या आजूबाजूला राहायला आली.  आमचा सगळ्यांचा शाळेव्यतिरिक्तचा बहुतांश वेळ ground-बाग- मंदीर यापैकी एके ठिकाणी जायचा.

गणपतीच्या १० दिवसात हे मंदीर विशेष गजबजून जायचं. तशी एरवी पण तिथे भजन म्हणणा-या आजीबाईंची गर्दी असायची, अनेक आजोबा निवांत बसलेले असायचे, दर्शनाला आलेले लोक टेकलेले असायचे.
पण गणपतीत मंदीर दिव्याच्या झगमगाटानी उजळून जायचं. मोठ्यानी गाणी लावलेली असायची. सा-रे-ग-म-प म-प-ध-नी-सा, गणराज रंगी नाचतो नाचतो, ओमकार स्वरूपा, अशी चिक मोत्याची माळ... दर वर्षी हीच सगळी गाणी. आमच्या घरातून हे सगळं दिसायचं. त्या गाण्यांची, दिव्यांची सोबत वाटायची, सवयच होऊन जायची दहा दिवसात.

माहात्मा नगरमधली सगळी मोठी मुलं committees form करून कसल्या कसल्या स्पर्धा ठेवायची. चित्रकला, fancy dress, नाच, गाणी, हस्ताक्षर, पाककला अशा नाना स्पर्धा.या स्पर्धांचं आणि त्यातल्या बक्षिसांचं कोण अप्रूप. त्यात एक दिवस fun fair असायचं बागेत, म्हणजे सगळे महात्मा नगरमधे लोक वेगवेगळे stalls लावायचे. बायका खाण्याचे, मुलं खेळांचे, कोणी कसले कोणी कसले. त्यात सगळ्या महात्मानगरची चिट्टी पिट्टी अगदी उत्साहानी भाग घ्यायची. सातवीत असताना एकदा मी आणि मितूनी पण एक stall लावलेला. ’kill the rat' नावाच्या खेळाचा. खेळ असा होता- एका teapoy सारख्या table वर आम्ही badminton ची shuttlecocks ठेवायची ची रिकामी नळी आम्ही तिरकी धरणार. आमचा एक हात त्या नळीत असणार. त्या आतल्या हातात एक ping-pong चा ball. आणि ज्याला खेळ खेळायचा आहे त्याच्या हातात लाटणं घेऊन तो समोर उभा. मग आम्ही kill the rat- kill the rat म्हणत कधीही तो ball त्या नळीतून सोडणार आणि समोरच्यानी त्याला लाटण्यानी बरोबर नेम धरून मारायचं. खेळ खेळायचे २ रुपये आणि जिंकलं तर milky bar बक्षिस. हा खेळ वाचायला जरी सो्पा असला तरी खेळायला नाही हो! hardly कोणाला त्या ball ला बरोबर मारता आलं असेल. आम्हाला किती फायदा झाला त्या दिवशी!!

गणपतीचे १० दिवस कसे जायचे कळायचं पण नाही. अनंत चतूर्दशी नंतर मंदीर पण सूनं सूनं वाटायचं. माझं काय म्हणणं असायचं की तुम्ही भले गणपती विसर्जन करून या पण मंदिरात ती गाणी तर चालू ठेवा! म्हणजे मग जरा तरी बरं वाटेल. पण तेव्हा ३-४ फूट उंची असलेल्या अस्मादिकांचे ऐकतो कोण?

दरवर्षी गणपती आले की हटकून महात्मानगरची आठवण येते आणि nostalgic व्हायला होतं.

पण पुण्यात पण गणपतीची कमी मजा नसते. ब-याच जणांना गणपतीचं इथलं जे प्रस्थ आहे त्याचा राग येतो. पण मला मात्र हे वातावरण जाम आवडतं. जशी दिवाळी ’in-air' असते तसे पुण्यात गणपती ’in-air' असतात. देखावे उभारणं, मग ते बघायसाठी लोकांची झुंबड, मोठ्यांदा लावलेली गाणी, traffic चा सावळा गोंधळ... सगळंच अवघड. आणि या सगळ्याचा crescendo म्हणजे विसर्जनाची मिरवणूक. कोणी काही म्हणो, ही मिरवणूक (त्यात द्दारू पिऊन नाचणारं public सोडल्यास) आणि त्यातले ढोल पथकांचे performances हा माझा अत्यंत आवडता प्रकार आहे. दर वर्षी न चुकता कोणा ना कोणाला पकडून मिरवणूक बघायला घेऊन जायचं बरोबर.

पण अर्थातच हे घरच्या गणपतीला compensation असूच शकत नाही. घरी गणपती बसण्याची मजाच वेगळी आहे. १० दिवस बाप्पाची कशी सोबत होऊन जाते. आणि मग विसर्जनानंतर ती जागा रिकामी रिकामी वाटत राहते. मग वाट पाहणं सुरू होतं पुढच्या वर्षीच्या गणेश चतूर्थीची....